महाराष्ट्र प्राकृतिक



महाराष्ट्र प्राकृतिक 


प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने महाराष्ट्राची पुढील तीन प्रमुख भागांत विभागणी केली जाते.:


  1. कोंकण 
  2. पर्वतीय प्रदेश 
  3. दक्खनचे पठार 


कोंकण:- 



  • महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत यांच्यामध्ये दक्षिणोत्तर गेलेला लांबट अरुंद प्रदेश म्हणजेच कोंकण होय.
  • प्रस्तरभांगामुळे कोकणची निर्मित झाली.
  • कोकण किनारपट्टीचा भाग हा रिया प्रकारचा किनारा म्हणून ओळखला जातो.
  • समुद्र किनार्याची लांबी ७२० किमी आहे.
  • कोंकणची रुंदी ३०-६० किमी आहे.
  • उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये कोकणाची रुंदी सर्वाधिक १००+ जास्त आहे.
  • कोकणात मालवण आणि हरणे गावाजवळ सागरी गुहा पहायला मिळतात 
  • उत्तर व दक्षिण कोकण असे कोकणाचे दोन भाग आहेत, ज्यात उत्तर कोकण जास्त रुंद तसेच औद्योगिक दृष्ट्या प्रगत आहे.
  • कोकणातील कमी उंचीचा भागास खलाटी असे म्हणतात. या भागात नारळ आणि सुपारीच्या बागा आढळतात 
  • अधिक उंची असलेल्या भागास वलाटी असे म्हणतात. या भागात शेतीचा अल्प विकास झालेला आढळतो. फलोत्पादनासाठी प्रसिद्ध.
  • दक्षिण कोकणात अतिपावसामुळे 'जांभा' प्रकारचा खडक आढळतो 
  • कोकणास अपरांत या नावाने प्राचीन काळी ओळखले जात असे.     
  • प्रमुख नद्या : उल्हास, वैतरणा, सावित्री, शास्त्री, तेरेखोल सूर्य भातसाई ई.
  • उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम:
  • उत्तर कोकण: दमनगंगा, वरोळी, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, काळू, उल्हास. (ट्रिक : दमनगंगेत वरोलीत सूर्य वैतागला,   तानसेन भाई का उगवला!)
  • मध्य कोकण: पाताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, गंधार, भोगावती, घोड, सावित्री, भारजा, जोग, जगबुडी, वशीष्ठी, शास्त्री, बाव (ट्रिक: पाताळात आंबा कुन्द्लीकाने का भोगला.   सावित्री, भारजा, जोगसह, वशीष्ठीला दिला.  जगबुडीस शास्त्रीने बाम दिला.)
  • दक्षिण कोकण: काजळी, मुचकुंदी, काजवी, शुक, वाघोटन, देवगड, आचरा, गड, कर्ली तेरेखोल (ट्रिक : कामुका आगकते)
  • Greater Flamingo Wilde Life Sanctuary - डहाणू खाडी 
  • कोकणातील खाड्या: उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम
  • पालघर जिल्हा: डहाणू, दतीवरे, वसई
  • ठाणे: ठाणे खाडी
  • मुंबई: मनोरा, मालाड, माहीम
  • रायगड: पनवेल, धरमतर, रोहा, राजपुरी
  • रायगड व रत्नागिरी: बाणकोट
  • रत्नागिरी: केळशी, दाभोळ, जयगड, भाट्ये, पूर्णगड, जैतापूर
  • रत्नागिरी व सिंधुदुर्ग: विजयदुर्ग
  • सिंधुदुर्ग: देवगड, आचरा, कलवली, कर्ली.


पर्वतीय प्रदेश 



  • सह्याद्री हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे.
  •  सह्याद्रीची पश्चिम बाजू तीव्र उताराची तर पूर्व बाजू मंद उताराची आहे.
  • सह्याद्रीच्या विस्तारित भागास पश्चिम घाट असेही म्हणतात
  • पश्चिम घाट उत्तरेस तापी ते दक्षिणेस कन्याकुमारी दरम्यान पसरलेला आहे.
  • पश्चिम घाटाची एकूण लांबी १६०० किमी आहे. तर सह्याद्रीची लांबी ७४० किमी आहे.
  •   पश्चिम घाटाची निर्मिती सेनोझोईक कालखंडा दरम्यान झाली.
  • जगातील सर्वाधिक जैवविविधता प्रदेशांपैकी हे एक प्रदेश असून यास UNESCO ने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे.
  • सह्याद्रीची सरासरी उंची १२०० मी. एवढी आहे.  


महाराष्ट्रातील इतर डोंगर रांगा: 



अ) सातपुडा:- 



  • नर्मदा व तापी नदीचा जलविभाजक 
  • नंदुरबार: अस्तंभा पठार (१३२५ मी.); तोरणमाळ पठार (१०३६ मी.)
  • अमरावती: गाविलगड टेकड्या; चिखलदरा (१११५ मी); बैराट शिखर (११७७ मी)      


ब) सातमाळा - अजिंठा:- 



  • तापी व गोदावरी चा जलविभाजक 
  • सातमाळा डोंगर मनमाडच्या पूर्वेकडे अंकाई-टंकाई पासून अजिंठा म्हणून ओळखला जातो. 


 जिल्ह्याचे नाव                          शाखेचे नाव 
नंदुरबार व धुळे गाळणा टेकड्या  
परभणी, हिंगोली, नांदेड निर्मल डोंगर  
हिंगोली हिंगोलीचे डोंगर 
नांदेड मुदखेड डोंगर 
यवतमाळ पुसदच्या टेकड्या 


क) हरिश्चंद्र-बालाघाट:- 



  • गोदावरी व भीमा नदीचे जलविभाजक 
  • पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर व बीड 
  • बालाघाट हा सपाट माथ्याचा प्रदेश आहे
  • हरिश्चंद्र रांगा प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यात आहे.   


जिल्ह्याचे नाव शाखेचे नाव
पुणे तसुमाई डोंगर 
अहमदनगर बाळेश्वर 


ड) महादेव डोंगर:- 



  • विस्तार प्रामुख्याने सातारा, सांगली व नगर जिल्ह्यात 
  • भीमा व कृष्णा नदीचा जल विभाजक  
  •  


ठिकाणाचे नाव                शाखेचे नाव
सातारा बामणोलीचे डोंगर  
कराड आगाशिवचे डोंगर  


इ) पूर्व महाराष्ट्रातील डोंगर व टेकड्या:- 



जिल्ह्याचे नाव                    शाखेचे नाव
नागपूर गरमसूर, अंबागड, मन्सुर टेकड्या   
चंद्रपूर व गडचिरोली भामरागड, सुरजागड, चिरोली, चांदूरगड, चिमूर   
भंडारा दरकेसा, नवेगाव  


महत्वाची शिखरे:- 



शिखर               उंची (मी)
कळसुबाई १६४६ 
साल्हेर १५६७
महाबळेश्वर १४३८ 
हरिश्चंद्रगड  १४२४ 
सप्तशृंगी १४१६ 
तोरणा १४०४


पठारी प्रदेश:- 






  • यालाच 'दख्खनचे पठार' असेही म्हणतात 
  • महाराष्ट्राचा सुमारे ८५% प्रदेश दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे.
  • बेसाल्ट खडकापासून निर्मित 
  • अहमदनगर पठार, सासवड पठार, बुलढाणा-मालेगाव पठार, तोरणमाळ पठार, औंध पठार, खानापूर पठार 
  • निर्मिती:-  
  • गोंडवाना भूभापासून तुटून युरेशियाकडे येणारे भारतीय भूपट्ट जेव्हा रियुनियन बेटाजवळून जात होते तेंव्हा सुमारे ७० दशलक्ष वर्षापूर्वी भ्रन्श्मुलक ज्वालामुखीचा उद्रेक होऊन त्या लाव्हारसाच्या निक्षेपणाने हे पठार तयार झाले.
  • या ठिकाणी २९ वेळेस ज्वालामुखीचा उद्रेक होऊन लाव्हारसाच्या संचायांने पठाराची उंची वाढत गेली.
  • हा लाव्हारस बेसिक / अल्कधर्मी प्रकारचा होता.
  • महाराष्ट्राच्या ईशान्य व पूर्व भागातील खडक 'आर्किक' प्रकारचे असून त्याचा दख्खन लाव्हारसाशी संबंध नाही.     

Comments

Popular posts from this blog

भारताच्या राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये

उत्तरेकडील प्राचीन राज्ये

December - WhatsApp Group Daily n Weekly Test Links