उत्तरेकडील प्राचीन राज्ये
उत्तरेकडील प्राचीन राज्ये
- उत्तर भारतात अनेक राजघराणी उदयास आली
- इंडो-ग्रीक, कुशाण, गुप्त व वर्धन
- सम्राट अशोकाच्याया मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याचा ऱ्हास सुरु
- शेवटचा मौर्य राजा ब्रिहद्रथचा पराभव त्याचाच सेनापती पुष्यमित्र शुंग याने केला
इंडो-ग्रीक सत्ता:-
- भारताच्या वायव्येकडील प्रदेशात राज्य
- मिनँडर राजाचा उल्लेख भारतीय ग्रंथात मिलिंद असा केलेला आपणास आढळतो
- मिनँडरचे राज्य हिंदुकुश पर्वत, काश्मीर, बुंदेलखंड पर्यंत
- त्याने नागसेन या भिक्खू बरोबर बौद्ध तत्वज्ञानावर प्रश्नोत्तरे स्वरूपी चर्चा केली
- यातून "मिलिंद पन्हो" म्हणजे मिलिंदचे प्रश्न ग्रंथाची निर्मिती झाली
- इंडो-ग्रीकानंतर वायव्य भागात शक-पहलव या मध्य आशियातील टोळ्यांनी स्वाऱ्या करून छोटी राज्ये स्थापन केली
कुशाण राजसत्ता:-
- शक- पहलवानंतर इसवी सनाच्या पहिल्या शतकात "कुशाण" भारतात आले
- सम्राट कनिष्क हा कुशानांचा प्रसिद्ध राजा होता
- त्याचे राज्य काबुलपासून वाराणसीपर्यंत होते
- त्याने सोन्याची व तांब्याची नाणी निर्माण केली
- नाण्यावर एका बाजूस कनिष्कची प्रतिमा आणि बाजूला "शाओ नाणो शाओ कनेष्की कुशानो" म्हणजे राजाधीराज कनिष्क कुशाण असे लिहिले होते तर दुसऱ्या बाजूस गौतम बुद्धांची प्रतिमा होती आणि ग्रीक भाषेत बोद्धो म्हणजेच बुद्ध असे लिहिले होते
- त्याच्याच काळात शेवटची व चौथी बौद्ध परिषद काश्मीर मध्ये पार पडली
गुप्त राजसत्ता:-
- इसवी सन 320 ते इसवी सन 600
- श्रीगुप्त हा घराण्याचा संस्थापक
- पहिल्या चंद्रगुप्ताच्या काळात प्रबळ सत्ता
- त्याचा मुलगा समुद्रगुप्ताने आपले राज्य आसामपासून पंजाबपर्यंत विस्तारले, त्याने कांचीपर्यंतचा किनारपट्टीचा प्रदेशही जिंकला होता
- वायव्य सरहद्देवरील राजे व श्रीलंकेतील राज्यांशी समुद्रगुप्तांचा मैत्री करार होता
- अलाहाबाद (प्रयागराज) येथील शिलालेखात समुद्रगुप्ताच्या दिग्विजयाचे वर्णन सापडते
- तो विद्या, कला व संगीतप्रेमी होता
- त्याचा मुलगा चंद्रगुप्त दुसरा याने वायव्येकडील अनेक राज्ये जिंकून घेतली
- शकांचा 'अरि' म्हणजे शत्रू म्हणून त्यास "शकारी" असे म्हणत
- त्याने माळवा, गुजरात व सौराष्ट्र आपल्या साम्राज्यास जोडले
- दक्षिणेकडील सामर्थ्यशाली वाकाटक घराण्यात आपल्या मुलीचा विवाह करून नातेसंबंध प्रस्थापित केले
- त्याच्या काळात "फाहीयन" हा चिनी प्रवासी भारतात आला होता, तो 14 वर्ष भारतात राहिला. त्याने गांधार, तक्षशिला, पेशावर, मथुरा, कनौज, श्रावस्ती, कपिलवास्तु, कुशीनगर, वैशाली ई. ठिकाणांना भेटी दिल्या
वर्धन राजसत्ता:-
- इसवी सनाच्या 6 व्या शतकात उदय
- सम्राट हर्षवर्धन हा एक प्रसिद्ध राजा
- नेपाळ ते नर्मदा आणि आसाम ते माळव्यापर्यंत विस्तारित राज्य
- लष्करी सामर्थ्य- पाऊण लाखापेक्षा जास्त फौज
- चीनला राजदूत पाठवीला
- राज्यातील सुव्यवस्था व शांतता पाहण्यासाठी स्वतः राज्यभर फिरत असे
- राजधानी कनौज
- बौद्ध धर्माचा अनुयायी- त्याच्या काळात युआन श्वान्ग हा विद्वान भिक्षु चिनहून भारतात आला. तो 15 वर्ष भारतात राहिला. त्याने नालंदा विद्यापीठात संस्कृत भाषेचा व बौद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास केला
- हर्षवर्धनने 'रत्नावली' व 'नागानंद' हि नाटके लिहिली
- बाणभट्ट हा प्रसिद्ध चरित्रकार त्याच्या दरबारी होता, त्याने 'हर्ष चरित्र' लिहिले
- राजाने सार्वजनिक दवाखाने व धर्मशाळा बांधल्या
- दर पाच वर्षांनी आपली संपत्ती लोकांना वाटून टाकत असे
#bharatstudyforum
Comments
Post a Comment