प्राचीन भारत व जग

प्राचीन भारत व जग

  • हडप्पा संस्कृतीकच्या काळापासून भारताचे इतर देशांशी व्यापारी संबंध होते

भारत व पश्चिमेकडील देश:-

  • रोमन साम्राज्याचा स्थापनेनंतर भारत व रोम यांतील व्यापार भरभराटीस आला
  • भारतातून तलम कापड, सुगंधी द्रव्ये, मोती, मौल्यवान खडे व मसाल्याचे पदार्थ रोमला निर्यात केले जात असत
  • भडोच, कल्याण, सोपारा, चौल, कालीकत हि व्यापारी बंदरे होती
  • भारताचा माल अरब व्यापारी इजिप्तमधील अलेक्झांड्रिया बंदरपर्यंत घेऊन जात असत, त्यांच्या मार्फतच युरोपियाना भारतीय तत्वज्ञान व विज्ञान यांचा परिचय झाला

भारत व इतर आशियाई देश:-

  • इ.स. दुसऱ्या शतकापासून पूर्वेकडील व आग्नेयेकडील देशांशी भारताचा घनिष्ट संबंध आला
  • भारतीय संस्कृतीचा म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, श्रीलंका या देशांवर प्रभाव आपल्याला दिसून येतो
  • श्रीलंकेस सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा याना बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी पाठविले
  • श्रीलंकेतील सिगिरिया येथील लेण्यांतील चित्रांवर अजिंठा चित्रशैलीचा प्रभाव दिसतो
  • श्रीलंकेत लिहिलेले 'दिपवंश' व 'महावंश' बौद्ध ग्रंथ भारत व श्रीलंकेच्या परस्पर संबंधांची माहिती देतात
  • चीन--- चीनमधील रेशमी कापडाला भारतात मोठी मागणी होती-- चिनी सम्राटाने धर्मरक्षक व कश्यप मातंग या बौद्ध भिक्खूना चीनमध्ये बोलावून घेतले -- त्यांनी अनेक बौद्ध ग्रंथांची चिनी भाषेत भाषांतरे केली -- चिनी सम्राटाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता

आग्नेय आशियातील देश:-

  • व्यापारासाठी/ धर्मप्रसारासाठी भारतीय लोक म्यानमार, कंबोडिया, थायलंड, इंडोनेशिया या देशांत जाऊन स्थायिक झाले -- त्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण झाली --इंडोनेशियातील बोरोबुदूर येथील बौद्ध स्तूपावर भारतीय स्थापत्य कलेचा फार मोठा प्रभाव आहे
  • रामायण - महाभारतातील कथांवर आधारित नृत्ये-नाट्ये इंडोनेशियात लोकप्रिय आहेत

Comments

Popular posts from this blog

भारताच्या राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये

मौर्य कालीन भारत

उत्तरेकडील प्राचीन राज्ये