प्रशासकीय विभाग
- महाराष्ट्र राज्यात 6 प्रशासकीय विभाग आहेत:- कोंकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर
- तसेच 5 प्रादेशिक विभाग आहेत: कोंकण, पश्चिम महाराष्ट्र/देश, खान्देश, मराठवडा, विदर्भ
- विदर्भ:-
- या प्रादेशिक विभागात अमरावती व नागपूर या प्रशासकीय विभागांचा समावेश होतो.
- ये विभागात एकूण 11 जिल्हे आहेत.
- याच प्रांताला बेरार असेही म्हणत असत
- राज्याच्या एकूण 31.6% क्षेत्रफळ विदर्भाने व्यापले आहे.
- तर एकूण लोकसंख्येच्या 21.3% विदर्भात वास्तव्य करते.
- प्राचीन काळी विदर्भ राजाने येथे पहिली आर्य वसाहत स्थापन केली होती.
- अमरावती येथील कुंडीनपूर हि विदर्भाची प्राचीन राजधानी होती.
- जागतिक ख्यातीचे लोणार येथील सरोवर बुलढाणा या जिल्ह्यात येते.
- गजानन महाराज यांची पुण्यभूमी शेगाव
- मराठवाडा:-
- औरंगाबाद प्रशासकीय विभाग यास मराठवाडा असेही ओळखले जाते.
- या प्रशासकीय विभागात सर्वाधिक 8 जिल्हे आहेत.
- महाराष्ट्राची पर्यटन राजधानी अशी औरंगाबादची ओळख आहे.
- अजिंठा- वेरूळ या जागतिक वारसा असलेल्या लेण्या या विभागात आहे.
- महाराष्ट्रात असलेल्या 5 ज्योतिर्लिंगांपैकी 3 मराठवाड्यात आहेत - घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ.
- गुरू गोविंद सिंग यांच्या पदस्पर्शाने पावन भूमी नांदेड याच विभागात आहे.
- महाराष्ट्राची कुलदैवत तुळजा भवानी आईचे मंदिर उस्मानाबाद या जिल्ह्यात आहे.
- देश:-
- सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश
- पुणे या प्रशासकीय विभागातील पाचही जिल्हे आणि नाशिक प्रशासकीय विभागातील नाशिक व अहमदनगर अशा 7 जिल्ह्यांचा समावेश
- भीमा शंकर व त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग
- देहू, आळंदी, पंढरपूर हि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
- राजर्षी शाहू महाराजांचे कोल्हापूर संस्थान
- सांस्कृतिक राजधानी अशी पुणे शहराची ओळख
- पूर्वेकडचे Oxford अशी ओळख
- खान्देश:-
- नंदुरबार, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांचा समावेश
- प्राचीन काळी ऋषिक देश अशी ओळख
- अकबराच्या दरबारात दानदेश असा उल्लेख
- कोंकण:-
- सह्याद्रीच्या पश्चिमेकडील आणि अरबी समुद्राच्या पूर्वेकडील चिंचोळा पट्टा
- प्राचीन काळात अपरांत असा उल्लेख
- कोंकण प्रशासकीय विभागातील 7 जिल्ह्यांचा समावेश
- पर्यटन जिल्हा - सिंधुदुर्ग
- देशाची आर्थिक राजधानी - मुंबई
- समुद्र किनारा लाभलेला एकमेव विभाग
- परशुराम यांची आई कुकनाच्या नावावरून कोंकण हे नाव अशी आख्यायिका
- अहमदनगर (17413 चौकिमी)
- पुणे (15642 चौकिमी)
- नाशिक (15530 चौकिमी)
- सोलापूर (14845 चौकिमी)
- गडचिरोली (14412 चौकिमी)
सर्वात लहान 5 जिल्हे:-
- मुंबई शहर (157चौकिमी)
- मुंबई उपनगर (446 चौकिमी)
- भंडारा (4087 चौकिमी)
- ठाणे (नवीन) (4214 चौकिमी)
- हिंगोली (4526 चौकिमी)
Comments
Post a Comment