इ.स.पू. 6 व्या शतकाच्या सुरवातीस उत्तर भारतात अनेक राज्ये होती, त्यांना जनपदे किंवा महाजनपदे असे म्हणत
त्यापैकी कोसल, वत्स, अवंती आणि मगध येथे राजेशाही तर वज्जी, मल्ल, कुरु, पांचाल, शाक्य येथे गणराज्य होते
या गणराज्यांत जेष्ठ व जबाबदार नागरिकांची एक गणपरिषद असे
राज्यातील सर्वोच्च अधिकार यांच्याकडे असत
तर प्रत्यक्ष दैनंदिन प्रशासनासाठी कार्यकारी मंडळ असे
कोसल:-
हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ व उत्तर प्रदेशाच्या भागांत
राजधानी साकेत
प्रसिद्ध नगरे- श्रावस्ती, कुशावती
प्रसेनजीत हा गौतम बुद्धांचा समकालीन राजा
वत्स:-
अलाहाबाद जवळील कौशम्बी हि राजधानी
उदयन हा पराक्रमी राजा
तलम कापडाची प्रसिद्ध बाजारपेठ
अवंती:-
मध्य प्रदेशातील उज्जैन हि राजधानी
प्रद्योत हा एक महत्वाचा राजा होता
मगधने अवंती राज्य जिंकून घेतले
मगध:-
बिहारच्या परिसरातील गंगा आणि शोण नदीच्या खोऱ्यात विस्तार झाला
बिम्बिसारच्या काळात मगधचा विस्तार होण्यास सुरुवात झाली.
त्याने काशी, अंग, मद्र, अवंती, कोसळ हि राज्ये जिंकली
राजगृह (आताचे बिहारमधील राजगिर) येथे मगधची राजधानी होती.
'महागोविंद' या वास्तुविशारदाने हे शहर आणि बिम्बिसारचा वाडा बांधला
बिम्बिसारच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता.
बिम्बिसारचा मुलगा अजातशत्रूच्या काळात मगधची भरभराट झाली.
अजातशत्रुने जैन व बौद्ध धर्मास राजाश्रय दिला.
तो गौतम बुद्धांचा समकालीन होता- त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार व प्रसार केला.
बौद्ध धर्माची पहिली परिषद अजातशत्रूने राजगृह या ठिकाणी भरविली.
शिशुनागने अवंती, कोसळ व वत्स हि राज्ये मगधला जोडली, त्याच्या काळात जवळजवळ सर्व उत्तर भारत मगध च्या वर्चस्वाखाली आला.
मगधचे नंद राजे:-
कालखंड:- ई.स.पू. ३६४ ते ई.स.पू. ३२४
प्राचीन भारताच्या इतिहासातील पहिले साम्राज्य
विस्तार: तक्षशीला, पंजाब, कर्नाटक, बंगाल, बिहार ते हिमालयापर्यंत
संस्थापक - महापद्म नंद
धनानंद हा शेवटचा नंद राजा होता. तो अत्यंत धनलोभी व जुलमी होता. त्यामुळे प्रजेत असंतोष होता. चंद्रगुप्त मौर्याने नंद राजवटीचा शेवट केला.
नंद राजांकडे चतुरंग सैन्य म्हणजे पायदळ, घोडदळ, हत्तीदळ व रथदळ होते.
परकीय आक्रमणे:-
मगध साम्राज्याच्या उदयाच्यावेळी इराणचा सम्राट दार्युश याने भारताच्या वाव्यवेकडील गांधार व सिंध प्रदेशांवर आकारमान केले व जिंकले- भारत व इराणमध्ये राजनैतिक संबंध वाढीस - त्यातून व्यापार आणि कलेच्या क्षेत्रात देवाणघेवाण वाढीस लागली.
सिकंदरची स्वारी:-
ग्रीक राजा अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इराणच्या साम्राज्याचा पाडाव केला. नंतर त्याने भारतावर स्वारी करून सिंधू नदी ओलांडून तक्षशीला व अभिसर हे राज्य जिंकून घेतले.
पुरू व सिकंदर यांच्यात झेलम नदी किनारी युद्धात राजा पुरूचा पराभव झाला.- मात्र युद्धातील पुरूच्या शौर्याचा सिकंदराने गौरव केला.
या दरम्यान सिकंदरच्या सैनिकांनी अतोनात हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या- भारतीय सैन्याच्या कडव्या प्रतिकाराला तोंड द्यावे लागले.- स्वदेशापासून दूर असल्यामुळे त्यांना मायदेशी जाण्याची इच्छा निर्माण झाली.- त्यामुळे त्यांनी सिकंदर विरुद्ध बंद पुकारले. त्यामुळे जिंकलेल्या भारतीय प्रदेशांची व्यवस्था आपल्या अधिकाऱ्यांवर सोपवून सिकंदर भारतातून माघारी फिरला.
बाबिलोन येथे ई.स.पू. ३२४ मध्ये सिकंदरचा मृत्यू झाला.
भारत - ग्रीस संबंध:-
सिकंदरच्या स्वारी नंतर भारत व ग्रीस मध्ये दळणवळण वाढले.
व्यापारवाढ झाली.
गांधार शिल्पशैली चा उदय - भारत व ग्रीक शिल्पकलेचा संगम
ग्रीकांची वैशिष्ट्यपूर्ण नाणी - एका बाजूला राजाचे आणि दुसऱ्या बाजूस एखाद्या देवतेचे चित्र असे.
Comments
Post a Comment